"हेय, हाऊ आर् यु टूडे?"
आमचा सिक्युरिटी ऑफिसर रोज संध्याकाळी ६ वाजता आमच्या इमारतीमधुन चक्कर मारतो. बरोब्बर ६:०५ ला माझ्या lab च्या बाजुला येतो आणि मला रोज न चुकता हा प्रश्न विचारतो! मीही माझ्या ठरलेल्या साचेबद्ध उत्तरापैकी एखादे त्याला उत्तर देतो : "आएम गुड", "नॉट बॅड!" किंवा तत्सदृश काहितरी. परंतु त्याच्या मुळ प्रश्नातच मुळी एक गम्मत आहे. आज कसा आहेस असे विचारायला, रोज माझ्या आयुष्यात खरेच काही वेगळे घडते का?

सकाळी विशिष्ट वेळेला कंटाळा करत उठतो. अंघोळ-टंघोळ करुन, अत्यंतिक बेचव सिरीअलचा बाउल रिचवत, संगणिकेवर पत्रं आणि हवामान बघतो. आवरुन कामाला. तोच रस्ता, तिच वेळ त्यामुळे माणसंही तिच. चौकातला भिकारी मला रोज तशीच हाक मारतो, मी तसेच दुर्लक्ष करत पुढे! पुढे जी काही तुरळक लोक समोरुन येत असतात त्यातून एक बुटका म्हातारा माणुस पुढे येतो. निळी टोपी, निळं जाकीट आणि निळी जीन्स ह्यामुळे ते 'निळकट्ट आजोबा' नावाने ओळखले जातात (म्हणजे सध्या तरी मी एकटा त्यांना त्या नावाने ओळखतोय!). चालताना एका पायाने किंचित अधू असल्यासारखे चालतात. पण फुटपाथचा संपूर्ण वापर केला पाहिजे असा त्यांचा नियम असल्याने फुटपाथच्या उजव्या बाजुपासुन डाव्याबाजुपर्यंत सारखे लेन बदलताना दिसतात. निळकट्ट आजोबांना एक सवय आहे. कॅनडात अनेक ठिकाणी फुकट वर्तमानपत्रे मिळतात. ती एका पेटीत रचुन ठेवलेली असतात आणि अश्या अनेक पेट्या गावभर मांडून ठेवलेल्या असतात. तर आमचे हे निळकट्ट आजोबा एखाद्या पेटीच्या ठिकाणी जातात त्यातले एखादे वर्तमानपत्र काढतात, दोन मिनिटं चाळल्यासारखे करतात, परत ठेवून देतात आणि पुढे सरकतात. मी अनेकवेळा अनेक वेगवेगळ्या पेट्यांवर त्यांना हे करताना पाहिलंय पण मला आजतागायत ह्याचे प्रयोजन लक्षात नाही आले! (अहो, ते फुकटचं वर्तमानपत्र आहे, घ्या की आणि घरी जाउन निवांत वाचा ना! (ह्या ह्या अश्याच फुकट्या प्रवृत्तीमुळे घरात पेपरांचा ढिग जमलाय, त्याचे काहितरी करा आधी मग द्या सल्ले दुस-यांना!)) ह्या आजोबांचे असे मनोरंजक निरिक्षण चालू असताना बाजुने एक गंभिर चेह-याचा माणुस जातो. ह्या बुवांविषयी मला कमालीचे आकर्षण आहे. त्याच्याकडे बघितल्यावर मला प्रकर्षाने वाटतं की हा कोणी एखाद्या राजघराण्याचा वंशज आहे. छान परिटघडीचे कपडे, तेही शक्यतो पांढ-या किंवा तत्सदृश सौम्य रंगाचे. त्यावर व्हेस्ट, त्या व्हेस्टच्या रंगाला शोभेल अशी प्यांट! व्यवस्थित विंचरुन लावलेले केस अन् त्यावर एखादी, समस्त पोषाखाला साजेश्या रंगाची ह्याट आणि व्हेस्टच्या खिशात जुन्या पद्धतीचे घड्याळ आहे की काय असे भासवणारी एक सोनेरी चेन. पायातले महागडे चकचकीत लेदरचे बूट हेही ह्या सगळ्या राजवैभवाला साजेसे! खांद्यावर नेहमी एखादी ब्याग, कधी शबनम-छाप तर कधी लेदरची. हा सद्गृहस्थ नेहमी नाकासमोर नजर ठेवून झपाझप चालत निघुन जातो. ह्याचा मागोवा घेउन नक्की करतो काय अशी गुप्तहेरगिरी करावी अशी खुमखूमी आवरती घेत मीही पुढे सरकतो.
पुण्याच्या गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत जसे कसब्याचा गणपती पुढे सरकल्यावर तांबडी जोगेश्वरी येतो, तसा हा निटनेटका राजपुत्र पुढं सरकल्यावर थोड्याच वेळात अजागळ 'जांभळ कपल' येतं! जांभळ्या कपलमधल्या पोरीच्या केसांची पुढची बट जांभळी आहे तर पोराच्या हातावर जांभळ्या रंगाचे ट्याटू गोंदवलेले आहेत! हे जोडफं रॉक संगिताचं भक्त आहे हे मी पैजेवर सांगायला तयार आहे. त्यांचा पोषाखच तसा असतो मुळी. प्रामुख्याने काळ्या रंगाचे ढगळ कपडे, त्यावर स्टीलच्या वस्तुंची एंब्रोयडरी! पैकी पोराच्या कानात काळ्या रंगाच्या तीन चकत्या तर पोरीच्या कानात रिंगाच रिंगा! दोघांच्या केसांची स्टाईल कोणत्याप्रकारची आहे ह्यावर अजुन माझेच एकमत झालेले नाही. पोराचे केस बहुधा बेकहम अधिक गांधिजी भागिले दोन, अश्या स्टाईलचे असावेत!
ह्या मंडळींच्या व्यतरिक्त, बसस्टॉपवर केस विंचरत उभी दिसणारी भारतीय वंशाची मुलगी(!), टीम होर्टीनच्या टपरीच्या बाहेर चकाट्या पिटणारी बेघर मंडळी, वृद्धाश्रमाबाहेर व्हिलचेअरवर बसून शून्यात बघणारे आजोबा अशी अनेक मंडळी मला नित्यनेमाने अगदी ठराविक ठिकाणी दर्शन देत राहतात. पण 'चिनी म्हातारा' नेमका कोणत्या वेळेस कुठे दिसेल ह्याचा काही नेम नाही. किंवा तो अगदी नियमितपणे आदल्या दिवशीपेक्षा वेगळ्या ठिकाणी दिसतो हे नक्की. आमच्या विद्यापीठाची पिवळ्या जर्द रंगाची पिशवी एका खांद्यावर लटकवून हे महाराज कोणता तरी रस्ता ओलांडतांना दिसतात. पण रस्त्यावर दिसणा-या इतर मंडळींच्यात आणि चिनी म्हाता-याच्यात एक फरक आहे. चिनी म्हाता-याशी मी बोललोय! एके दिवशी मी जेव्हा डबा आणायचा आळस केला होता तेव्हा विद्यापीठाच्या खानावळीत बर्गर गिळत निमुटपणे बसलो होतो. तेव्हा माझ्या शेजारच्या खुर्चीवरुन आवाज आला,
"एक्सक्युज मी!"
"...?" मी बर्गरसाठी वासलेला 'आ' शेजारी बसलेल्या चिनी म्हाता-याकडं वळवला.
चिमा : तुला काय वाटतं, वय महत्वाचे की पात्रता?
मला काही झेपलंच नाही! अरे ह्या प्रश्नाला काही प्रस्तावना?
मी : ..?
चिमा : त्याचं काय आहे, चिन मधे एका नोकरीसाठी मी अर्ज धाडतोय, पण समस्या अशी आहे की नोकरीचे पात्रता वय कमाल ३५ वर्षांचे आहे, आणि मी आहे ५६ चा! पण मी म्हणतो एव्हढ्या 'साध्या' कारणासाठी कोणी माझा अर्ज रद्दबातल कसे काय करु शकेल?...
बर्गरसाठी मघाशी आवासलेला आ अजूनही बंद नाही झाला हे माझ्या लक्षात आले!
चिमा : .. माझा अनुभव त्यांनी लक्षात घेतला पाहिजे ना! मी ३४व्या वर्षी इकडं आलो. आज माझ्याकडं २०+ वर्षांचा अनुभव आहे. तेही महत्वाचे आहे ना?
मी : हो ना! (आता ह्या व्यतरिक्त मी काय म्हणू शकत होतो? पण सिरीअस्ली, ३५ आणि ५६??)
पुढे दहा मिनीटं त्याचं आत्मचरित्र ऐकत ऐकत बर्गर संपवला आणि शेवटी 'जेवण झालं' हे कारण देत तिथुन अक्षरश: कल्टी मारली! तर असा हा चिनी म्हातारा सतत बिचारा नोकरी शोधत ह्या दुकानातून त्या दुकानात हिंडतोय असे मला उगिचच वाटत राहतं!
अशा नानाविध माणसांना रोज न चुकता हजेरी देत मी कार्यस्थळी दाखल होतो. आता मी काय काम करतो (किंबहुना करतो की नाही) हा आंतरराष्ट्रीय वादाचा मुद्दा असल्यानं त्याच्या खोलात न गेलेलं (माझ्यादृष्टीनं) बरे! (पण हो, संशोधन क्षेत्रात काम करतो म्हणजे रोज बाथरुममधुन 'युरेका-युरेका' म्हणत बोंबलत उठतो असेही नव्हे.) अर्थातच संशोधनाच्या पाट्या टाकताना चहापाण्याच्या वेळा अचूक सांभाळल्या जातील ह्याची मात्र मी पुरेपूर काळजी घेतो. अरे हो, चहापाणी म्हटल्यावर आठवले, एकवेळ उपरोल्लेखित सर्व घटनांना अपवाद घडू शकतो, पण एक गोष्ट रोज म्हणजे रोज म्हणजे रोज घडते ती म्हणजे आमच्या स्टिव्हच्या डब्यातल्या 'बिन्स'. स्टिव्ह रोजच्या रोजच्या रोज डब्यात एकाच प्रकारे शिजवलेली एकाच पद्धतीची कडधान्यं आणतो. रोऽऽज! त्याच्याबरोबर डबा खाताना आदल्या दिवशीचीच रेकोर्डींग समोर चालू आहे असं भासतं. खरं म्हणजे त्याचा रोजचा दिवस हा तर माझ्यापेक्षाही चाकोरीबद्ध आहे! तो एकतर खुप शिस्तीचा आणि अर्थातच वस्तू जागच्या जागी ठेवणारा आहे. एकदम मितभाषी आणि जंटलमन प्रकाराच्या स्टिव्हचा दिवस कितीही चाकोरीबद्ध असला तरी त्याचं आयुष्य बाकी एकदमच बंडखोर वाटेचं. प्रस्थापित नातेसंबंधाच्या चौकटीला आणि लग्ननिर्देशांना न जुमानता आज स्टिव्ह त्याच्या फिलीपिनी पार्टनर बरोबर सुखाचा संसार करतोय.
तसं बघायला गेलं तर निळकट्ट म्हातारा असो, राजपुत्र असो, जांभळ कपल असो, चिमा असो वा स्टिव्ह असो सगळे रोज एकसारखंच आयुष्य जगत असतात. तरी मला रोज त्यांची नोंद घ्यावीशी का वाटते? रोज काहितरी वेगळं घडतय अश्या भावाने मी का निरिक्षणं नोंदवत असतो? की खरेच मंडळी चाकोरीचे आयुष्य काढतात? सगळेच जण फुकटची वर्तमानपत्रे उचलतात मग निळकट्ट म्हातारा का नाही उचलत? आणि राजपुत्र अश्या जुन्या धाटणीच्या अवतारात आधुनिक जगात काय म्हणून वापरतो? जांभळ कपल बटा जांभळ्या करुन फिरताना किंवा कानात चकत्या घालून वावरताना आजुबाजूच्या प्रस्थापित वेषभूषेला काटशहच नाही का देत? चिमाला छपन्नाव्या वर्षी पस्तिशीच्या नोकरीची उमेद कशी काय येते? किंबहुना अश्या नोकरीसाठी प्रयत्न करावा हा विचारच कसा काय येतो? आणि रोज कडधान्याचं अळणी जेवण घेणा-या स्टिव्हला नातेसंबंधात ठसका लावणारा मसाला टाकायची ताकत कुठून येते? वरकरणी चाकोरीबद्ध तरिही चाकोरीच्या बाहेरचं आयुष्य जगणार्या ह्या मंडळींना एकदा थांबवून मला विचारायचंय:
'हाऊ आर यु टूडे?'

सदरहू लेख सह्याद्री एक्सल्पोरर्स च्या दिवाळी २०११ विशेषांकासाठी लिहिला होता. हा अंक इथे उपलब्ध आहे.
सुरेख. व्यक्तिचित्रे आवडली. तू 'पीपल्स फोटोग्राफी' सुरू केलीस तर विषय भरपूर आहेत. :)
ReplyDeleteबाकी अमेरिकन लोकांसारखीच कनेडियन लोकांनाही ही सवय दिसते. अमेरिकन 'हाय, हाउ यू डूइंन?" असे उत्तराची अपेक्षा अन करता रोज म्हणतात. मराठीत मात्र गाडी काय विशेष? च्या पलिकडे जात नाही ते ही नेहेमी नाही.
"पोराचे केस बहुधा बेकहम अधिक गांधिजी भागिले दोन"....!!
ReplyDeleteSuperlike...मला अजून तरी हा भागाकार करता आलेला नाही..:)
दिपावलीच्या हार्दिक शुभेछा
:)
व्यक्तिचित्रे आवडली
ReplyDeletewaah... sundar..
ReplyDeletemaze routine yahun wegale nahi .. pan ya vicharana ase shabd deta yetil ase watale nahvate..
utaam...khup chaan!!!