Wednesday, November 17, 2010

'आम्ही कोण?' - (अजुन) एक विडंबन

केशवसुत आणि आचार्य अत्रे ह्यांची जाहिर क्षमा मागुन, "आम्ही कोण?" ह्या कवितेच्या विडंबनाचे विडंबन.

आम्ही कोण?
'आम्ही कोण?' म्हणुनी काय पुसता माउस टिचकावुनी ?
देखिले जणू नाही अमुचे प्रोफाईल अजुनी तुम्ही ?
लक्षोलक्ष व्हिजीटा झडती ज्या फेसबुकी, दिसले
त्या रद्दी-डेपोत न कसे तुम्हा अमुचे 'बुक' अजुनी?

ते आम्ही - धडाधड टाकू ब्लॉगान्चेही सडे
ते आम्ही - भरवून टाकू पिकासाही तोकडे
ओर्कुट-फोर्कुट कोठेही जा झेंडा अमुचा वसे
कोण्याही मराठ-फोरमी अमुची टिपणी दिसे!

रेषेवर आम्ही जणू, दिसे नभोमंडळी तारका
साईटही अमुची जणू गुगललोकीची द्वारका
सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या*
इकडून-तिकडून लिंका ढापू, साईट सजवू पहा

आम्हाला वगळा - गतप्रभ किती होतील गुगल बझे
आम्हाला वगळा - 'ई-सकाळी' कमेंट कैसी पडे?

           - भालचंद्र पुजारी.
-----------------------------------------------------------
(*मूळच्या मूळ कवितेतून ढापिल!)



मूळ कविता 'केशवसुत', मूळ विडंबन 'आ. अत्रे'.

3 comments:

  1. मी तुला म्हणणारच होतो की ब्लॉगवर टाक :)

    ReplyDelete
  2. तुम्ही छान विडंबन आणि कविताहि करू शकता हे माहित नव्हतं . नेहमीप्रमाणे खूपच छान...!!!

    ReplyDelete