फार वेळ वाट पाहू न देता आमच्याकडे बर्फाळा येउन थबकला! मागे म्हटल्याप्रमाणे, आमच्या मते, इकडे कॅनडात दोनच ऋतू: एक हिवाळा आणि दुसरा बर्फाळा! पैकी हिवाळ्यात थंडी वाजते तर बर्फाळ्यात सगळ्या संवेदना आजुबाजूच्या बर्फाप्रमाणे गोठून गेलेल्या असतात.
तर असा बर्फाळा येणार म्हणून आम्हीसुद्धा कसून तयारी केली होती; निदान तसा आमचा समज तरी होता! भले थोरले, woodland चा बाप शोभतील असे, बूट घेउन आलो. ('पादत्राण' शब्दाचा उद्गम बहुधा असलेच काहितरी बघून झाला असणार!) पुण्यात असताना कधी मफ्लर वापरुन माहित नाही, इथे इमानेइतबारे एक मफ्लर घेउन ठेवला. पुण्याहून येताना आणलेली कानटोपी अंमळ तकलादू आहे हे ज्ञान व्हायला फार काळ लागला नाही! चुपचाप एक कानटोपीही घेउन आलो. थोडक्यात काय तर बर्फ पडायला सुरु व्हायच्या आधी आम्ही पुरेसी मानसिक तयारी करुन बसलो होतो.
आणि बर्फ पडला. आणि सोबत पाराही! -१०, -१५, -२५... बघता बघता -३० सेल्सिअस चा असह्य ॠतू चराचराला गोठवता झाला. हवेत होती नव्हती ती सगळी आर्द्रताही बर्फ बनुन जिथे जागा मिळेल तिथे जाउन बसली. सगळं कसे पांढरं-फटाक! इतक्या थंड हवामानात सगळे कसे निर्जीव होउन जाते. बहुतांश झाडांनी पाने केव्हाच झाडून टाकलीयत, त्यामुळे एखादी वा-याची झुळूक आलीच तर त्या सोबत डोलायला कोणी नाही. बहुतांश पक्षीगणही केव्हाच दक्षिणेच्या ऊबदार हवामानाकडे निघून गेलेत. जे कोणी एखाद-दुसरं आहेत ते चुपचाप काळोख्या ढोल्यांमध्ये लपून बसलेत. त्यामुळे पहाटे पक्षांच्या किलबिलाट किंवा चिवचीवाटासारखे रोमँटीक काहिही घडत नाही! सगळं कसे एकदम चिडीचूप, निष्प्राण! इतक्या थंडीत सूर्यही उगवायचा कंटाळा करतो आणि उगवल्यावर लगेचच घरी परतायच्या घाईत असल्यासारखा क्षितिजावरच टाईमपास करताना दिसतो. त्यामुळे माफक सूर्यप्रकाशाचा बर्फावर काडीमात्र परिणाम होत नाही.
पण ह्या सगळ्याचा आमच्या उत्साहावर थोडीच परीणाम होणार? आम्हीही थंडीच्या नाकावर टिच्चून ठरवून टाकले की कामाच्या ठिकाणी रोज पायीच चालत जायचे! (लेखकाने 'ठरवून टाकले' असे म्हटले आहे, 'संकल्प केला' असे म्हटलेले नाही, त्यामुळे संकल्पभंगाचे पाप माथी लागायची शक्यता नाही हे वाचकांच्या लक्षात आलेच असेन!) तशीही आमची खत्रुडातली खत्रूड सायकल चोरीला(!) गेल्यावर आम्ही पायीच चालत होतो त्यामुळे काही वेगळी तयारी करायची गरज नव्हती. आणि अंतर जेमतेम दोन किलोमीटर, ते २०-२५ मिनीटात पार होऊन जाते त्यामुळे थंडीची जाणिव व्हायच्या आत आपण ईप्सित जागी पोहोचलेलोसुद्धा असू असा आम्ही अंदाज बांधला! (वाह रे माझ्या राजा!). त्यानंतर आमची ही रोज बर्फ तुडवत जाण्याची वहिवाट सुरू झाली!
आधी सांगितल्याप्रमाणे आमची मानसिक तयारी जय्यत आहेच, फक्त निघताना रोज काय ती शारिरीक तयारी करावी लागते इतकेच. (व्यायाम? का उगिच गम्मत करता राव!?) लज्जारक्षणार्थ असलेल्या कपड्यांव्यतरिक्त, थर्मल्स, त्यावर एक साधा टी-शर्ट, त्यावर कामाच्या जागी मिरवायचा शर्ट, त्यावर एक स्वेटर त्यावर एक जाडं भरडं जॅकेट, हातात एक किंवा दोन हातमोजे, डोक्यावर कानटोपी, त्यावर जॅकेटची टोपी, लांबीचे आणि मानेच्या परिघाचे अचुक गणित करुन गुंडाळलेला मफ्लर; जो नाकाच्या शेंड्यावर तोलून धरला जातो, पायात जीन्स, एक किंवा दोन मोजे आणि त्यावर आमचे धट्टेकट्टे बूट, अशी जय्यत तयारी करुन आम्ही रोज युध्दभूमीकडे प्रयाण करायच्या अविर्भावात घराचे दार ओढून घेतो. आणि इथेच पहिली समस्या न चुकता उभी राहते.
इतकी सगळी साग्रसंगित तयारी केल्यावर त्या जाड्याभरड्या हातमोज्याने काहि केल्या जीन्सच्या खिशात आतवर गेलेली किल्ली बाहेर काढता येत नाही! आम्ही अजुन घराच्या बाहेर पण इमारतीच्या आतल्या उबदार वातावरणातच असतो आणि त्या ड्यांबिस किल्लीच्या आणि हातमोज्याच्या अहमहिमिकेमध्ये आमचा मफ्लरमध्ये गुंडाळलेला श्वास गुदमरायला लागतो! मग परत मफ्लर बाजुला करुन, हातमोजा काढून, वस्त्रप्रावरणांची आवरणं बाजुला काढत खिशातून किल्ली काढुन मार्गस्थ होईपर्यंत कानटोपीने निषेध दाखल केलेला असतो, मफ्लरने गणित चुकवून ठेवलेले असते आणि ती वस्त्रप्रावरणांची आवरणेही टोचायला लागतील अश्या अवस्थेत चुरगाळून गेलेली असतात! पण चिडचीडिचा परमोच्च बिंदू तेव्हा येतो जेव्हा जिन्याच्या चार पाय-या उतरल्यावर हे लक्षात येते की, पेन, रुमाल, पाकीट, कार्ड किंवा तत्सदृश, हरवायचा अंगिभूत गुण असलेल्या कोण्या वस्तुने, आमच्या नजरेला गुंगारा देउन कालच्या शर्ट/पँटच्या खिशात दडी मारलीय!
पण 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार असे' अश्या घोषवाक्याने प्रेरित आमच्यासारख्या मावळ्याला असली क्षुद्र संकटं थोडीच थांबवणार आहेत? आम्हीही त्या सर्वांवर मात करत, आमची चिलखतं सावरत मोठ्या उमेदीनं इमारतीच्या बाहेर पडतो! हवेच्या थंडगार झोतासह नवोन्मेषाने संचारत आम्ही यात्रा सुरू करतो. पायाखाली कुरुकूरू वाजणा-या बर्फावर निर्धाराने पावले टाकत, दर चार पावलांमागे सिंहावलोकन करत, बर्फावर उमटलेली स्वतःचीच पावले कौतुकाने न्याहाळत आम्ही बाणेदारपणे मार्गाक्रमण करु लागतो!
हळुहळू डोळ्यांच्या आजुबाजूला थंड वाटू लागते. मग आम्ही मफ्लर अजुन थोडा वर उचलतो आणि कानटोपी खाली खेचतो; भुवयीच्याही थोडी खालीच! आता आम्हाला डोळ्याच्या वरच्या बाजुला टोपी, खालती मफ्लर आणि आजुबाजुला जॅकेटची टोपी असे चौकटबद्ध जग दिसू लागते. मफ्लर, टोपी सावरण्यासाठी खिशातुन बाहेर काढलेला हात आता गारठतो, मग आम्ही परत खिशात तो खुपसून मार्गस्थ!
दोन चार गल्ल्या पार केल्या रे केल्या की आमच्या बुटाची नाडी बंड करुन उठते. बुटाची सुटलेली नाडी ही दातात अडकलेल्या बडिशेपेच्या तुकड्यासारखी असते; काही केल्या स्वस्थ बसू देत नाही! आमच्या दृष्टीने बुटाची सुटलेली नाडी म्हणजे धर्मसंकट. आता ती नाडी बांधायची म्हणजे हात खिशातुन तर काढावेच लागतात पण हातमोज्यातूनही काढावे लागतात! पण 'तस्माद् अपरिहार्ये अर्थे' असे म्हणत, उणे तिस अंश सेल्सिअसच्या तापमानात बधरटलेल्या बोटांनी नाडी बांधताना आम्ही त्या बुट कंपनीच्या मालकांच्या खानदानाचा उद्धार करुन मोकळे होतो.
पदयात्रा सुरू करुन पाच सात मिनिटे होतात न होतात तो आम्हाला जाणिव होउ लागते की मघाशी ते 'नवोन्मेष' का काय संचारलं होते ते आजुबाजूच्या बर्फात गोठून गेलंय! पण तरिही आम्ही नेटाने पावले टाकत मोठ्या चौकाच्या सिग्नलपाशी येउन थडकतो. चौक ओलांडण्यासाठी सिग्नल मिळेपर्यंत आजुबाजूच्या परिस्थितीचा आम्ही आढावा घेउ लागतो. कॅनडात रस्त्यावरचे बर्फ घसरडे होउ नये म्हणुन त्यावर बारीक वाळू पसरवतात. त्यामुळे येणा-या जाणा-या वाहतुकीच्या पायदळी तुडवून बर्फाचा चिखल तयार होतो. पण बर्फही निगरगट्ट; इतक्या कारा, बसा, ट्रके अंगावरुन जाउनसुद्धा वितळायचे नाव घेत नाही. माती, वाळू आणि बर्फ ह्यांचा भुसभूशित चिखल रस्त्याच्या आजुबाजूला छोटीशी भिंत तयार करतो. हे सगळे निरिक्षण चालू असताना, आमचे गारठलेले हात काही केल्या टाळ्यावर यायचे नाव घेत नसतात. आम्ही दुर्लक्ष करत मार्गस्थ!
आता एक विचित्र समस्या समोर येते. आमचा मफ्लरमधून बाहेर पडणार उच्छवास आमच्या डोळ्यांकडे सरकतोय हे आम्हाला माहितीच असते. पण आता हळुहळू तो पापण्यावर पाणी आणि बर्फाची एक झालर बनवायला लागतो! आमची परत चिडचीड, आता पापण्या साफ करणे म्हणजे खिशात गरम होऊ पाहणारा हात परत बाहेर! पण पर्याय तरी काय म्हणा! खरेतर आता आम्हाला हेही कळून चुकते की मफ्लरच्या बाहेर सर्वत्रच बारीक बर्फ जमलाय! आम्ही चुपचाप मफ्लर न हलेल ह्याची काळजी घेत परत गारठलेला हात खिशात कोंबून वाट चालू लागतो.
नाकाला खाज सुटणे, कानात गुदगूल्या होणे, डोळ्यात काहितरी गेल्यासारखे वाटणे किंवा गारठलेले हात अस्वस्थ करणे अश्या असंख्य छोट्यामोठ्या समस्या आमच्या प्रवासात विघ्न आणू पाहातात पण आम्ही निर्धाराने दुर्लक्ष करत पुढे सरकतो! आमची एक वाईट खोड आहे, (तश्या अनेक आहेत,पण सध्यापुरती एकच.) रस्त्यावरुन चालता चालता बाजुला साठलेल्या भुसभूशीत बर्फाला लाथ तरी मारायची किंवा त्यात पाय किती खोल बुडतो हे तपासण्यासाठी त्यात पाय रोवायचा! वाटताना गम्मत वाटते, पण आख्खा बूट वरुन-खालून बर्फाने माखून जातो! मग काय हळुहळू बूटातून थंडी आमच्या पायांपर्यंत पोहोचतेच! आम्ही परत बूट कंपनीच्या मालकांच्या खानदानाचा उद्धार करतो! एव्हाना आम्ही अर्ध्याच्या वर अंतर आलेलो असतो पण आता पाउले थंड पडू लागलीयत अशी भावना जोर धरू लागते. आमचे हात आधिच थंडीला वैतागलेत आता पायही त्यात सामिल. हातापायांतून आत एक थंडीची लकेर नाचून जाते आणि -३०ची थंडी हाडांपर्यंत पोचते! (तसे आमच्या हाडांपर्यंत पोहोचायला थंडीला विशेष श्रम पडत नसावेत)
गारठलेले हात-पाय, मफ्लरभोवती साठलेल्या बर्फाने गारठलेला चेहरा, नाकाला सुटलेली खाज, कानाला सुटलेल्या गुदगुल्या, पापण्यावर साचलेला बर्फ ह्यामुळे आमची चिडचीड पराकोटीला पोचते. कधी एकदा एखाद्या इमारतीत शिरतो असे होउन जाते. अजुन पाच एक मिनिटांचे चालणे बाकी असेल आणि थंडीने नाकी नउ आणलेले असतात. इतक्यात समोरून परीशुद्ध कॅनडीयन माणूस जातो. ना हातात मोजे, ना मानेवर मफ्लर, ना डोईवर कानटोपी! थंडीवरच उपकार करतोय अश्या अविर्भावात लटकवलेले जॅकेट! जाताना तो मंदस्मित करतो; आम्हाला वाटते की जणू वाकुल्या दाखवत म्हणतोय
"हे हे हे! ये तो बस शुरवात हैं| आगे आगे देखो होता हैं क्या!!"
Wednesday, November 24, 2010
Wednesday, November 17, 2010
'आम्ही कोण?' - (अजुन) एक विडंबन
केशवसुत आणि आचार्य अत्रे ह्यांची जाहिर क्षमा मागुन, "आम्ही कोण?" ह्या कवितेच्या विडंबनाचे विडंबन.
देखिले जणू नाही अमुचे प्रोफाईल अजुनी तुम्ही ?
लक्षोलक्ष व्हिजीटा झडती ज्या फेसबुकी, दिसले
त्या रद्दी-डेपोत न कसे तुम्हा अमुचे 'बुक' अजुनी?
ते आम्ही - धडाधड टाकू ब्लॉगान्चेही सडे
ते आम्ही - भरवून टाकू पिकासाही तोकडे
ओर्कुट-फोर्कुट कोठेही जा झेंडा अमुचा वसे
कोण्याही मराठ-फोरमी अमुची टिपणी दिसे!
रेषेवर आम्ही जणू, दिसे नभोमंडळी तारका
साईटही अमुची जणू गुगललोकीची द्वारका
सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या*
इकडून-तिकडून लिंका ढापू, साईट सजवू पहा
आम्हाला वगळा - गतप्रभ किती होतील गुगल बझे
आम्हाला वगळा - 'ई-सकाळी' कमेंट कैसी पडे?
- भालचंद्र पुजारी.
-----------------------------------------------------------
(*मूळच्या मूळ कवितेतून ढापिल!)
मूळ कविता 'केशवसुत', मूळ विडंबन 'आ. अत्रे'.
आम्ही कोण?'आम्ही कोण?' म्हणुनी काय पुसता माउस टिचकावुनी ?

Tuesday, October 26, 2010
पैलतीरी काफ्का!
"मित्रा, काय कानफाटात दिल्यासारखं गायलायस!!" अशी अवधूत गुप्तेंची प्रतिक्रिया बहुधा आपण ऐकलीच असेल. काही कलाकार आपल्या कलाकृतीद्वारे आपल्याला असे काही स्तंभित करुन टाकतात की जणु कानफाटात बसल्यासारखे वाटते! आणि जेव्हा जपानी लेखक, "हारुकी मुराकामी" कानफाटात देतात तेव्हा पाचही बोटे व्यवस्थित गालावर उमटतील ह्याची ते खात्री घेतात!
मागे एकदा, आमचे मित्र राज ह्यांनी मुराकामींच्या "Kafka on the shore" नामक पुस्तकाबद्दल लिहिले होते. त्यानंतरही त्यांच्या वेगवेगळ्या टिका-टिप्पणीतुन मुराकामींचे नाव सतत कानावर येते होते. राज हे चांगले व्यासंगी मित्र, म्हणुन म्हटले जरा बघावे कोण आहेत हे मुराकामी आणि त्यायोगे Kafka on the shore हे पुस्तक वाचायला घेतले!
Kafka on the shore चे पहिलेच (खरे म्हणजे शून्यावे) प्रकरण "कावळा नावाचा मुलगा" असे असल्याने, लगेचच ध्यानात येते की हे जरा वाचायला जड जाणारे पुस्तक आहे! आणि शेवटच्या पानापर्यंत मुराकामी तशी पुरेपूर खात्रीही घेतात. तसे बघायला गेले तर हे पुस्तक एका पंधरावर्षीय मुलाचे आहे. जो आपल्या बापाला वैतागून आईचा शोध घ्यायला घराबाहेर पडतो. त्याला येणारे गोचर आणि अगोचर अनुभवांच्या झालरीतून तयार झालेले कथानक म्हणजे Kafka on the shore! पण अर्थात ही फक्त ह्या पंधरा वर्षीय मुलाचीच कथा आहे असे म्हणणेही जरा चुकीचे आहे. खरेतर मुलगा फक्त इतर पात्रांना आणि घटनांना जोडणार दुवा आहे.
पुस्तकाच्या सुरवातीच्या प्रकरणांमधुन अनेक, वरकरणी असंबद्ध अशी, कथानकं जन्माला येतात. वाचकालाही माहित असते की काहितरी करुन हे सगळे घागे एकत्र जोडले जाणार, पण कसे जोडले जाणार ह्याचे गुढ जपण्यात मुराकामी कमालीचे यशस्वी होतात. प्रत्येक प्रकरणांनिशी गहन आणि गुढ होत जाणारे कथानक अश्या धक्कादायक वळणांमधुन जाते की, 'पुढे काय होणार?' हा जीवघेणा प्रश्न पुस्तक हातातून ढळू देत नाही!
पण Kafka on the shore ची फक्त कथाच सुरस आहे असे नाही. किंबहुना "काफ्का..." ची खरी ताकद त्यातल्या तत्त्वज्ञानात आहे! प्रत्येक प्रकरणातुन, प्रत्येक पात्राकडून मुराकामी खुप सारे प्रश्न, अनेक कोडी निर्माण करतात आणि वाचकाला गहन विचारात बुडवतात. काहींची उत्तरे पुस्तकात मिळतात , तर काही मिळतात की नाही हे सांगणे जरा अवघडच आहे! कथेत खुप सा-या रुपकांची रेलचेल आहे. कोणी मांजरांशी गप्पा मारणारा म्हातारा असो किंवा कोणी कर्नलचे रुप धारण केलेला "एब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट" असो, कधी आकाशातुन पडणा-या जळवा असो किंवा मांजरांच्या आत्म्यांंपासुन बनवलेली बासरी असो! एक ना दोन अश्या अनेक रुपकांतून वाचकाच्या डोक्यात सतत प्रश्नांचे काहुर माजुन जाते!
Kafka on the shore च्या कथेतुन डोकावणारी पात्रंसुद्धा निराळीच. जवळजवळ सगळीच पात्रं समाजातल्या मुख्य प्रवाहापासुन बाजुला पडलेली. अर्थात, प्रस्थापित नातेसंबधांच्या चौकटीला छेद देणारं किंवा व्यवहारी मनाला अगोचर वाटणा-या घटनांची मंदियाळी असलेल्या कथानकाची पात्रंही सर्वसामान्य असुन कसे चालेन?!
ह्या पुस्तकाचे कथानक, त्यातली पात्रं, घडणा-या घटना सगळंच क्लिष्ट आणि प्रचंड प्रमाणात धक्कादायकही आहेत. खुद्द मुराकामींच्याच मते हे पुस्तक एकदा वाचुन समजणे जरा अवघड आहे! मुराकामी हे मराठीतल्या जीए किंवा ग्रेस ह्यांच्या जातकुळाचे. त्यामुळे जर तुम्ही जीए/ग्रेसांचे पंखे असाल किंवा काहीतरी बौद्धीक खुराकाच्या शोधार्थ असाल तर पैलतीरीचा काफ्का तुमची वाट बघतोय!!

You sit at the edge of the world,
I am in a crater that's no more.
Words without letters
Standing in the shadow of the door.
The moon shines down on a sleeping lizard,
Little fish rain from the sky.
Outside the window there are soldiers,
steeling themselves to die.
(Refrain)
Kafka sits in a chair by the shore,
Thinking for the pendulum that moves the world, it seems.
When your heart is closed,
The shadow of the unmoving Sphinx,
Becomes a knife that pierces your dreams.
The drowning girl's fingers
Search for the entrance stone, and more.
Lifting the hem of her azure dress,
She gazes --
at Kafka on the shore"
— Haruki Murakami (Kafka on the Shore)
Sunday, September 26, 2010
फॉल पडला!
पाश्चिमात्य देशात वर्षाची साधारणपणे चार ऋतुंमध्ये विभागणी केलेली असते: वसंत (स्प्रिंग), उन्हाळा (समर), शरद (फॉल/ऑटम) आणि हिवाळा (विंटर). पण कोणी काही म्हणू द्या कॅनडामध्ये केवळ दोनच ऋतू आहेत असा आमचा दृढ समज आहे. एक हिवाळा आणि दुसरा बर्फाळा! पैकी बर्फाळा हा वर्षातले ६ महिने (ऑक्टोबर ते मार्च) असतो आणि मी ज्याला हिवाळा म्हणतो त्या ऋतूत इथल्या लोकांनी बाकीचे ऋतू कोंबुन ठेवलेले आहेत. परन्तु एका भारतीयानं २५ अंश सेल्सिअस प्रसन्न तापमानाला उन्हाळा म्हणणं म्हणजे त्याच्या भारतीयत्वाशी प्रतारणाच की! पण कितीही संक्षिप्त तरी सर्व ऋतू आपापली पदाचिन्हे सोडून जातातच हे नक्की.
पैकी वसंत आणि शरद हे रंगेबिरंगी ऋतू आहेत. वसंतात झाडांवर विविध रगांची फुले उमलतात तर शरदात झाडांची पाने आपला रंग बदलतात आणि अख्खा भूमि लाल-हिरव्या-सोनेरी रंगाचे भरजरी वस्त्र ल्यालासारखी दिसते. असा हा रंगेबिरंगी फॉल सध्या आमच्याकडे पडलाय. (म्हणजे ऊन पडणे, थंडी पडणे, पाऊस पडणे अश्या अर्थानं!). मी ज्या ठिकाणी पक्षीनिरीक्षणाला जातो ती जागा एकदम भन्नाट आहे. शहरापासुन दूर, नदीकिनारी थोड्याश्या उंचीवर वसलेल्या ह्या जागेवरुन खुप दूरवरचा परिसर पहायला मिळतो. त्यातून ही "नॉर्थ-सास्कॅचवन" नदी एक विलोभनीय वळण घेत 'चंद्रभागा' होते! वळणदार नदी, बाजुला गर्द झाडी, समोर मैलोन्-मैल सपाट प्रदेश आणि क्षितिजावर एडमंटन शहराच्या गगनचुंबी इमारती ह्या सगळ्यामुळे लँडस्केप (छाया)चित्रकारीतेसाठी ही एक आदर्श जागा बनुन जाते! त्यातून शरदाची रंगपंचमी चालू असेल तर काय विचारा!
वळणदार नदी आणि आजुबाजुला 'पडलेला' फॉल! |
ह्या झाडांची पण गम्मत असते. काही झाडांची पाने पिवळी होतात तर काहींची लाल. काही पांढरी पडतात तर काही रंग बदलण्याच्या भानगडीतच पडत नाहीत! परीणामतः विविधरंगी झुबक्यांनी सगळ परिसर नटुन जातो.
कधिकधी वाटुन जातो अरे हे सगळं कशासाठी चाललंय? (ईश्वरानं समस्त सृष्टी मनुष्याच्या उपभोगासाठी आणि मनोरंजनासाठी बनविलेली आहे, अश्या 'इंटेलिजेंट डिझाईन'च्या मतप्रवाहाशी मी आजिबात सहमत नाही!) ह्या सगळ्यामागचं विज्ञानही फार भन्नाट आहे.
सगळ्याची सुरवात होते, ते पानांमधल्या क्लोरोफीलपासून! झाडं सतत क्लोरोफील तयार करत असतात, जे पानांमध्ये साचले जाते. क्लोरोफील सूर्यप्रकाशाचे रुपांतर झाडांना आवश्यक त्या उर्जेमध्ये करते (प्रकाश संश्लेषण). ह्या क्लोरोफीलमुळेच पानांना हिरवा रंग येतो. जसाजसा हिवाळा जवळ येउ लागतो तशीतशी सूर्यप्रकाशाची तिव्रता आणि काळ कमी होऊ लागतो. मग झाडांची उर्जेचे रुपांतर करण्याची प्रक्रियाही मंदावते. पण पानांमधुन बाष्पीभवनाच्या प्रक्रियेतुन खुप सा-या पाण्याचा अपव्यय होउ लागतो! मग अश्यावेळी काही झाडं, ज्यांना पानगळी/पानझडीची झाडे म्हणतात, ती सरळपणे आपली पानेच झडून टाकायची प्रक्रीया सुरू करतात! त्याच्याच एक भाग म्हणुन ही झाडं क्लोरोफील बनवणे थांबवतात. जसेजसे पानांमधिल क्लोरोफील संपू लागते तसे तसे त्यातील इतर घटक (पिगमेंट्स) दृष्टीस पडू लागतात, मग ज्या पानांत जे घटक आहेत त्या नुसार त्यांना पिवळा, लाल, राखाडी असे विविध रंग प्राप्त होतात! बाकी काही झाडे (सूचीपर्णी) असे रंग बदलण्याच्या कटकटी करण्यापेक्षा जरा जाडसर पाने निर्माण करतात आणि बाष्पीभवनापासून स्वतःला वाचवतात. ती सदैव हिरवीच राहतात.
पण ह्या रंगबिरंगी ऋतूलासुद्धा जराशी उदासिनतेची झालर आहे. क्षितिजाच्या पार आता हाडं गोठवणारी थंडी वाट बघत आहे, आता सृष्टी उजळून टाकणारा सूर्यप्रकाश आता अभावानेच येणार, आता पक्षी दूरदेशी निघुन जाणार अश्या विचारांनी कविमनं हळवी होतात. आटणारा सूर्यप्रकाश मन खच्ची करुन जातो. (हो, तुम्हाला माहितीय का की, सूर्यप्रकाश सर्वात प्रभावी 'अँटी-डीप्रेसंट' मानला जातो!) त्यामुळे अश्या ऋतूंमध्ये कविलोकांनी विरहाची भाषा केली नाही तर नवलच.
Who now has no house, will not build one (anymore).
Who now is alone, will remain so for long,
Will wake, and read, and write long letters
And back and forth on the boulevards
Will restlessly wander, while the leaves blow
- Herbsttag (Autumn Day) by Rainer Maria Rilke. (विकीवरुन साभार)
सूर्यप्रकाशात उजळून गेलेल्या इमारती अन् आभाळात साचलेलं मळभ! |
Monday, September 6, 2010
पास्ता!
आज मी चक्क एका पाककृतीबद्दल लिहिणार आहे! एकटं राहिलं की, स्वतःच स्वयंपाक बनवून खावं लागतं त्यामुळे स्वाभाविकच स्वयंपाकघरात जाणं होतं! पण समस्या अशी आहे की, संतमंडळींन्नी म्हटल्याप्रमाणे "आळस हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे" (आणि "गरज ही शोधाची जननी असेल, तर आळस हा त्याच्या बाप आहे!"), त्यामुळे कधितरी, नेहमी, वारंवार, रोजच्या रोज तुम्हाला स्वयंपाकाचा आळस येणे हे स्वाभाविकच आहे! त्यातुन बहुतांश भारतीय पदार्थ हे 'साग्र-संगित' प्रजातीत मोडतात आणि भारतीय जेवण बनवणं हे कमालीचं जिकरीचं बनुन जातं. मग एका बाजुला आळस आणि एका बाजुला भुक, अश्या दारूण प्रसंगी युरोपातले पदार्थ मदतीला धावून येतात! ईटालीचा पास्ता हा त्यापैकीच एक!
पास्ता हा ईटालियन जेवणाचा अनिवार्य भाग आहे. पण पास्ता हे कोणत्या एका पदार्थाला उद्देशुन नाव नाही. पास्त्याचे अक्षरशः हजारो प्रकार आहेत आणि ते अस्मितेसमान ईटालियन मातीत जपले जातात! साधारणपणे कणिक किंवा मैदा तिंबुन जे काही बनवता येईल त्याला ढोबळमानाने पास्ता नाव देतात. मग त्या कणकेपासुन जर शेवया बनवल्या तर त्यांना "स्फगेटी" म्हणायचं, नळ्या बनवल्या तर "मॅकरोनी" म्हणायचं, मोठे चौकोन लाटले तर "लझानिया" म्हणायचं आणि स्प्रिंगा बनवल्या तर "फ्युसिली" म्हणायचं. अर्थात त्यांचे आकार-लांबी-रुंदी ह्या वरुन पुढे त्यांची हजारो नावे तयार होतात.
पास्त्याच्या अनेक सोप्या पाककृती आहेत पण मी जी पाककृती सांगणार आहे, ती झटपट होणारी नाही पण कमी परिश्रमाची आहे (आळस!). तर पास्ता बनवण्याची सुरवात होते, पास्ता खरेदी करण्यापासुन. बाजारात जाउन तुम्हाला आवडेल त्या आकाराचा पास्त आणावा (मी बहुदा स्प्रिंग किंवा शिंपल्याचा आकाराचा पास्ता आणतो). ह्या व्यतरिक्त तुम्हाला काही खास ईटालियन पदार्थ पण लागतात: थोडे ऑलिव्ह तेल, पार्सेली, टोमॅटोची पेस्ट, चीज (ह्या पदार्थांना शेंगदाणातेल, कोथिंबीर, केचअप आणि पनीर हे पर्याय होउ शकत नाहीत हे वाचकांनी ध्यानात घ्यावे!), कांदा आणि लसुण. हे पदार्थ तसे मॉल्समध्ये सहज सापडतात!
प्रथम एक मोठा बाउलभर पास्ता शिजवात ठेवावा (मला वस्तूंची मापं ग्रॅम-मिलीमध्ये सांगणं जरा विचित्र वाटतं). त्यासाठी पास्ताचं पाकीट पहावं. प्रत्येक पास्त्याची शिजवण्याची वेळ ठरलेली असते आणि ती त्या पाकिटावर नोंदवलेली असते. उकळत्या पाण्यात साधारण १०-१५ मिनिट पास्ता शिजत ठेवावा लागतो. कमी वेळ शिजला तर पास्ता चांगला लागत नाही आणि जास्त वेळ शिजला तर लगदा होतो. पास्ता शिजत असताना बाजुला थोडी पार्सेली, १ कांदा आणि २/३ लसुण एकदम बारीक चिरुन ठेवावेत. पास्ता शिजुन झाला की, ऑलिव्ह ऑईल तापवत ठेवावे. ऑलिव्ह ऑईल तापल्यावर (किंवा बराच वेळ झालात असे वाटल्यावर) त्यात पार्सेली परतुन घ्यावी, मग लसुण परतावा मग कांदा परतावा.कांद्याने रंग बदलला की परतुन परतुन कंटाळा आला की त्यात टोमॅटोची पेस्ट घालावी. टोमॅटो पेस्ट जरा सढळ हातानेच घालावी लागते. साधारण एक मोठी वाटी. २-३ मिनिटं परतावे! (ही परतण्याची प्रक्रिया चालू असताना शेफाने/शेफीने स्वतःच्या भारतीय प्रकृतीला काबूत ठेवावे. ह्या सर्व प्रकारात, जिरे, मोहरी, मेथ्या, कसुरी मेथी, उडीद डाळ, हळद, गोडा, गरम किंवा गार मसाला, तिखट ई. ई. काहीही घालण्यापासुन स्वतःला परावृत्त करावे आणि पास्त्याचे ईटालियनत्व अबाधित ठेवावे). आता ह्या मिश्रणात शिजवलेला पास्ता (पाणी काढून) टाकून नीट ठवळावा, त्यात चवीनुसार मीठ टाकून थोड्यावेळ झाकून ठेवावं. मग त्यावर थोडे (खरे सांगायचे तर भरपुर) चिज टाकून तापू द्यावे, चिज वितळून सर्वत्र पसरल्यावर गॅस बंद करावा! झाला पास्ता तयार!
पास्त्याला चव ऑलिव्ह ऑईल मध्ये तळलेल्या पार्सेली-कांद्या-लसणामुळे येते आणि अर्थातच चिज तर महत्त्वाचे! वाचकाच्या ध्यानात आलेच असेल की, ह्यात तिखटजन्य पदार्थांची उणिव आहे. जर तुम्हाला जर थोडा मसाला हवाच असेल तर बाजारात जरा तिखटाकडे झुकणारे "ईटालियन-ड्रेसिंग" मिळते त्याचा वापर करु शकता. (अर्थात भारतीय मसाले वापरुन केलेला "पंजाबी-पास्ता" अनेक हॉटेलांत मिळतोच की!)
आणि हो, एक सांगायचे राहिलेच! इतके सगळे झाल्यावर शेफाला/शेफीला आपला पास्ता आवडेलच ह्याची कोणतीही शाश्वती लेखक देउ शकत नाही. वाचकांनी विवेक जागृत ठेवावा. :)
पास्त्याचे प्रकार! (विकीपिडीया वरुन साभार.) |
पास्ता हा ईटालियन जेवणाचा अनिवार्य भाग आहे. पण पास्ता हे कोणत्या एका पदार्थाला उद्देशुन नाव नाही. पास्त्याचे अक्षरशः हजारो प्रकार आहेत आणि ते अस्मितेसमान ईटालियन मातीत जपले जातात! साधारणपणे कणिक किंवा मैदा तिंबुन जे काही बनवता येईल त्याला ढोबळमानाने पास्ता नाव देतात. मग त्या कणकेपासुन जर शेवया बनवल्या तर त्यांना "स्फगेटी" म्हणायचं, नळ्या बनवल्या तर "मॅकरोनी" म्हणायचं, मोठे चौकोन लाटले तर "लझानिया" म्हणायचं आणि स्प्रिंगा बनवल्या तर "फ्युसिली" म्हणायचं. अर्थात त्यांचे आकार-लांबी-रुंदी ह्या वरुन पुढे त्यांची हजारो नावे तयार होतात.
पास्त्याच्या अनेक सोप्या पाककृती आहेत पण मी जी पाककृती सांगणार आहे, ती झटपट होणारी नाही पण कमी परिश्रमाची आहे (आळस!). तर पास्ता बनवण्याची सुरवात होते, पास्ता खरेदी करण्यापासुन. बाजारात जाउन तुम्हाला आवडेल त्या आकाराचा पास्त आणावा (मी बहुदा स्प्रिंग किंवा शिंपल्याचा आकाराचा पास्ता आणतो). ह्या व्यतरिक्त तुम्हाला काही खास ईटालियन पदार्थ पण लागतात: थोडे ऑलिव्ह तेल, पार्सेली, टोमॅटोची पेस्ट, चीज (ह्या पदार्थांना शेंगदाणातेल, कोथिंबीर, केचअप आणि पनीर हे पर्याय होउ शकत नाहीत हे वाचकांनी ध्यानात घ्यावे!), कांदा आणि लसुण. हे पदार्थ तसे मॉल्समध्ये सहज सापडतात!
प्रथम एक मोठा बाउलभर पास्ता शिजवात ठेवावा (मला वस्तूंची मापं ग्रॅम-मिलीमध्ये सांगणं जरा विचित्र वाटतं). त्यासाठी पास्ताचं पाकीट पहावं. प्रत्येक पास्त्याची शिजवण्याची वेळ ठरलेली असते आणि ती त्या पाकिटावर नोंदवलेली असते. उकळत्या पाण्यात साधारण १०-१५ मिनिट पास्ता शिजत ठेवावा लागतो. कमी वेळ शिजला तर पास्ता चांगला लागत नाही आणि जास्त वेळ शिजला तर लगदा होतो. पास्ता शिजत असताना बाजुला थोडी पार्सेली, १ कांदा आणि २/३ लसुण एकदम बारीक चिरुन ठेवावेत. पास्ता शिजुन झाला की, ऑलिव्ह ऑईल तापवत ठेवावे. ऑलिव्ह ऑईल तापल्यावर (किंवा बराच वेळ झालात असे वाटल्यावर) त्यात पार्सेली परतुन घ्यावी, मग लसुण परतावा मग कांदा परतावा.
पास्त्याला चव ऑलिव्ह ऑईल मध्ये तळलेल्या पार्सेली-कांद्या-लसणामुळे येते आणि अर्थातच चिज तर महत्त्वाचे! वाचकाच्या ध्यानात आलेच असेल की, ह्यात तिखटजन्य पदार्थांची उणिव आहे. जर तुम्हाला जर थोडा मसाला हवाच असेल तर बाजारात जरा तिखटाकडे झुकणारे "ईटालियन-ड्रेसिंग" मिळते त्याचा वापर करु शकता. (अर्थात भारतीय मसाले वापरुन केलेला "पंजाबी-पास्ता" अनेक हॉटेलांत मिळतोच की!)
आणि हो, एक सांगायचे राहिलेच! इतके सगळे झाल्यावर शेफाला/शेफीला आपला पास्ता आवडेलच ह्याची कोणतीही शाश्वती लेखक देउ शकत नाही. वाचकांनी विवेक जागृत ठेवावा. :)
Monday, August 16, 2010
इट्स रेनिंग इन बार्सेलोना
"लाली" - बार्सेलोनातल्या पडक्या चाळीत राहणारी एक वेश्या, जिला अभिरुचीप्रधान गि-हाईकं आवडतात, त्यासाठी ती संग्रहालये, विद्यापीठ अश्या ठिकाणी भेटी देते; "कार्लोस" - लालीचा दलाल आणि प्रियकर, तिच्याबरोबर राहतो पण ती सोडून जाईल ह्या भयगंडानं सदैव पछाडलेला; डेव्हिड - लालीचा जुना गि-हाईक, रोज आपल्या आजारी बायकोच्या मरणाची वाट पहाणारा. तिघांच्या नात्यात किती गुंतागुंत.
डेव्हिडचे पुस्तकांचे दुकान आहे. त्याचा साहित्याचा अभ्यासही बरा आहे. तो नेहमी लालीसाठी एखादी कविता वाचून दाखवतो किंवा कुठल्याश्या पुस्तकातल्या चार ओळी. त्याला फक्त शांतपणे बसून तिला पहायचे असते. कार्लोसला साहित्य, संग्रहालयं, शाळा असल्या कोणत्याही गोष्टीत रस नाही. नाही म्हणायला तो लालीसाठी चॉकलेटच्या वेष्टनावर छापलेल्या चारोळ्या वाचून दाखवत असतो पण त्यापेक्षा त्याचा साहित्याशी अधिक संबंध नाही! आणि खरेतरं लालीलाही "डांटे" सोडून दुसरा कोणताच कवि/लेखक माहिती नाही! पण तिला शिकावंसं सारखं वाटतं, कविता ऐकाव्याश्या वाटतात, म्हणुन डेव्हिड तिचा 'फेव्हरेट-क्लाएंट' आहे. कार्लोसला स्वाभाविकच डेव्हिडबद्दल आकस आहे. आणि खिडकीबाहेर घिरट्या घालणा-या 'सि-गल' पक्षाला बहुधा तिघांची गम्मत वाटते!
आजही डेव्हिड आला. नेहमीप्रमाणे, ठरलेल्या वेळेच्या आधीच. कार्लोसला घाईघाईत बाहेर पडावं लागलं. डेव्हिडला आता खात्री झाली आहे की, येत्या काही दिवसात त्याची बायको मरणार. आज डेव्हिड लालीला समुद्राबद्दल सांगतोय. तिला सांगतोय की, "कधीतरी त्या अथांग समुद्राकडे डोळे भरुन पहा, कधी उर भरुन त्याची जड हवा श्वासात सामवून पहा. बघ तो समुद्र तुला काय सांगतोय ते. बघ त्याच्या यांत्रिक लाटा ह्रदय कसे हेलावून देतील. त्याच समुद्राचा यांत्रिकपणा तुला प्रेम म्हणजे काय ते समाजावेल. लाली, कधीतरी ह्या चाळीच्या भिंतींबाहेरचे जग उघड्या डोळ्यांनी पहा, मोकळ्या मनाने पहा, जगात बरेच काही सुंदर आहे! ... लाली ऐक माझे, सोड हा धंदा, दुसरे काहीतरी कर", लालीही हसत म्हणतेय "बरं, मी सोडेनही, मग तु काय करशीन?".. "हा हा, अर्थात तु माझ्यसाठी अपवाद ठेवशीलच की!" ...
पण लालीच्या डोक्यात ही गोष्ट खरचं पिंगा घालू लागलीय की खरंच आपल्याला हा धंदा सोडून दुसरे काही करता येईल का! कार्लोस मात्र नुसत्या अश्या विचारानेही कावून उठतो : "काय? हा धंदा सोडायचा?! मग दुसरे काय करणार तु? आणि मी काय करायचे? ... आणि बाहेर महिन्यात कमावणार नाहीस इतके इथे दिवसात कमावतेस!" लालीकडेही ह्याची काहिच उत्तरे नाहीत.. बाहेरच्या सि-गल कडे पहात अश्रू ढाळण्याव्यतरिक्त ती तरी काय करू शकते.
आजही डेव्हिड आला. आज बाकी त्याने कोणतीच कविता आणलेली नाही. आज त्याला तिला काहितरी विचारयचेय. बराच वेळ शांततेत गेल्यावर तो धीर करुन विचारतोच.
"डॉक्टर म्हणतायत की, बायकोकडे जास्तीत जास्त दोन दिवस आहेत."
"ओह्ह्ह!"
"नाही, तसे अपेक्षीतच होतं, पण मी तुला ह्यासाठी सांगितले की, माझी अशी ईच्छा आहे की, तु तिच्या अंत्यविधीसाठी यावेस"
"काय?"
".. हो .. आणि तु चार शब्दही बोलावेस तिथे, त्यानावाने तु आजपर्यंत ऐकलेले वाचलेले कामी येईल! ... प्लिज तुझ्या येण्याने मला फार बर वाटेल"
लाली कबुल करते.
दोन दिवस झाले डेव्हिडच्या बायकोला जाऊन. कबुल केल्याप्रमाणे खरेच लाली अंत्यविधीसाठी गेलीसुद्धा! कोणत्यातरी पुस्तकातुन पाठ केलेल्या चार ओळी तिने बोलूनही दाखवल्या. पहिल्यांदाच समाजात उजळ माथ्यानं वावरली ती. पहिल्यांदाच चाळीच्या चार भिंतीच्या बाहेरील जग ख-या अर्थाने पाहिले. लाली खुष आहे. नुसतीच उजळ माथ्यानं वावरली म्हणुन नाही तर तिला आता नोकरीही लागलीय! आता ह्या धंद्यातुन बाहेर पडण्याचा आंनद ती लपवू नाही शकत आहे आणि म्हणुनच तिने डेव्हिडला घरी बोलावून कार्लोसशी भेट घडावायची ठरवलीय.
डेव्हिड घरी पोहोचलाय पण लाली काहितरी आणण्यासाठी बाहेर गेलीय. बाहेर जोराचा पाऊस चालु आहे त्यामुळे तिला यायला उशीर होतोय बहुधा. त्यामुळे घरात डेव्हिड, कार्लोस आणि कमालीचा तणाव. कार्लोसला डेव्हिड कधीच आवडला नाहि आता तर मुळीच नाही.
शांतता आता बाकी अस्वस्थ करायला लागलीय.
डेव्हिडः बराच वेळ लागतोय नाही तिला?
कार्लोस: ह्म्म्म
शांतता!
कार्लोसः .. तर तू म्हणे लालीला स्वतःच्या दुकानात नोकरी दिलीयस?
डेव्हिडः हम्म! तिला आवड आहे पुस्तकांची
कार्लोस : आणि आता मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे?
....... शांतता! डेव्हिड खिडकीबाहेरचा पाउस बघणं पसंत करतोय...
कार्लोस : किती पैसे देणारेस?
डेव्हिड : ९०० युरो .. वर्षाला
कार्लोस : ९००?
डेव्हिड : "सर्व्हीस" पकडुन
कार्लोस : सर्व्हीस?
डेव्हिड : हम्म सर्व्हीस!
कार्लोस : तिला माहितीय का?
डेव्हिड : अजुन पर्यंत नाही पण सांगेन लवकरच!
.....
कार्लोस : वेल्ल!.. तसे असेल तर ९०० बरेच कमी आहेत..
डेव्हिड : काय??
कार्लोस : हो! इतके मोठे दुकान तुझे आणि फक्त ९००? तेही सर्व्हीस पकडून? नाही जमणार .. १२०० युरो!
डेव्हिड : बाराशे?? वेडा आहेस का? माझे दुकान इतकेही फायद्यातले नाही!
कार्लोस : ठिक आहे मग ११००?
डेव्हिड : नाही नाही .. १००० शेवटचं
कार्लोस : १०००?
डेव्हिड : हम्म हजार
कार्लोस : ठिक आहे हजार तर हजार!
डेव्हिड : ठरलं तर मग!
दोघेही शेक-हँड करतात .. दरवाजा वाजतो .. लाली आली .. भिजून! तिने तिघांसाठी हॉट डॉग्स आणलेत... तिघेही एकत्र बसुन आस्वाद घेतायत..
डेव्हिड खुष आहे...
कार्लोसही खुष आहे...
लालीसुद्धा खुष आहे ...
बाहेरचा पाऊस बाकी थांबायचं नाव घेत नाहिये! ............
------------------------------------------------------------
It’s Raining in Barcelona
http://www.raininginbarcelona.com/
by Pau Miró (translated by Sharon G. Feldman)
Directed by Jim Guedo
Starring Alan Long (David), Leora Joy Godden (Lali), & Jeffrey Pufahl (Carlos)
-----------------------------------------------------------
Tuesday, July 27, 2010
फणसाडचा थरार!
खरंतर ही गोष्ट कॅनडात घडलेली नाही, पण परवा चहाच्या टेबलावर कोणीतरी विषय काढला की, तुमच्या आयुष्यातील सर्वात थरारक प्रसंग कोणता? आणि तत्क्षणी माझ्या डोळ्यासमोर फणसाडचा रस्ता तरारुन गेला!
जंगलं ही माझ्यासाठी तीर्थक्षेत्रासमान आणि फणसाडचे जंगल हे सर्वात आवडीच्या जंगलांपैकी एक! रायगड जिल्ह्यातील मुरुड गावाजवळ बसलेले हे साधारण ७० चौ. किलोमिटरचे छोटेखानी अभयारण्य. पण ह्या जंगलात वाघ नाहीत, सिंह नाहीत, हत्तींचे कळप नाहीत, झेब्रा, गेंडे, मगरी असेही काही नाही. जीपमधुन सफारी नाही, राहायला अलिशान गेस्ट-हाउस नाहीत, ट्रेड-मार्क ठरावं असे इथे काही म्हणजे काही नाही. पर्यायाने (आणि सुदैवाने) इकडे हौशी पर्यटक फार काही यायच्या फंदात पडत नाहीत! पण मला विचाराल तर, ह्या जंगलाकडे जंगलाला म्हणुन हवे असलेले सगळे गुण आहेत! जीवघेणी गंभिरता, त्याच्या निबिडतेत साचुन राहिलेला अंधार, पक्षांचे नाद, जंगलभर झिरपणारा माकडांचा घुत्कार, वेल्यांच्या जीर्ण-शीर्ण जाळ्या, विशाल झाडांची शेवाळलेली राकट खोडं आणि सदैव मानगुटीवर बसणारा थरार; बिबट्याचा थरार! हो, इथे बरेच बिबटे आहेत!
तुम्ही जसे जंगलात दाखल होता तसे हळुहळू बिबट्यांच्या कथा कानावर येउ लागतात आणि मग रात्री तुम्ही बाहेर तंबू टाकून राहता तेव्हा त्या सगळ्या कथा तुमच्या भोवती पिंगा घालायला लागतात! एकंदरीत काय तर तुम्ही सदैव बिबट्याच्या छायेत जगत असता! माझ्याबाबतीतली थरारक गोष्ट ह्याच छायेत उलगडते.
सगळ्या रोमांचाची सुरवात झाली, जेव्हा मी आणि माझे पक्षीमित्र श्री. भागवत आणि श्री. वाघेला, वनरक्षक श्री. नाईक ह्यांच्याबरोबर जंगालातले पक्षीनिरिक्षण संपवुन आमच्या तंबुकडे परतत होतो तेव्हा! सकाळाचे अकरा वाजले असतील, आम्ही आमच्या सुपेगावच्या मुक्कामी पोहोचतच होतो तेवढ्यात एका घराच्या छतावर कौलं नीट करता करता, एकाने हाळी दिली - "ओऽऽऽ नायीकसायब, तुम्च्या बिबट्यांनं ढोर मारलं बगा!"
त्या दिवशी पहाटे गावाबाहेर एक वासरु बिबट्याने मारलं होते आणि झाडीत लपवून ठेवलं होतं. कदाचित उजाडल्यामुळे त्याला ते खाऊन संपवता आलं नव्हतं. पण त्याचा एक अर्थ असाही होता की, ते वासरु खायला बिबट्या परतणार! आणि जर आजुबाजूला दबा धरुन बसलो तर आम्हाला बिबट्याला पहाण्याची सुवर्णसंधी मिळणार होती! बिबट्या ती शिकार संपवायला परतणार हे १००%, ही संधी कशी सोडणार! आता आमचा डाव असा होता की त्या शिकारीच्या आजुबाजूला काही लपायला जागा मिळते का ते पाहणे आणि संध्याकाळी दबा धरुन बसणे! मी तर झाडावर रात्र काढायचीही मानसिक तयारी करुन बसलो होतो! आम्ही महत्प्रयासाने त्या बिबट्याची ती शिकार शोधली. हळुहळू गावकरीही जमु लागले. बिबट्या ४ वाजल्यानंतर कधिही येइल असे सगळ्यांचेच मत होते. आम्ही असे गृहित धरुन होतो की साधारण अंधार झाला, म्हणजे सहा-साडेसहा की त्यानंतर बिबट्या येईल. तरी अगदी दुपारी ५ पासुन तिथे ठाण मांडायचे ठरवले! पण बिबट्याने शिकार लपवायला जागासुद्धा अशी भन्नाट शोधली होती की आम्हाला काय प्लान आखावा तेच समजत नव्हतं. जंगलाचा जवळजवळ सर्व भाग डोंगररांगांमध्ये बसलाय. एका ऊतारावर ओढ्यामुळे तयार झालेल्या एका छोट्याश्या घळीत बिबट्यानं शिकार लपविली होती. आजुबाजूला सगळीकडे झुडपं माजलेली. जवळपास मोठी झाडं अशी फार कमी. एक साधारणसे झाड शिकारीपासून अगदीच पाच फुटावर! तर दुसरे मोठे आंब्याचे झाड ३०-४० फुटांवर आणि तिथुनही बाकीच्या झुडपांमुळे शिकार दिसतच नव्हती. त्यापलिकडे सर्व निलगिरी! त्यामुळे आम्ही बिबट्या येण्याच्या विरुद्ध बाजुच्या झाडीमध्ये चक्क आमची कार घालायची ठरवलं आणि कारमध्येच दबा धरायचे नक्की केले. अर्थात जिथे शिकार होती तिथे कार आणणे महामुष्कील काम होते, पण तिथे भागवतांचा दांडगा अनुभव कामी आला! शिकार जिथे होती त्याच्यापासुन वरच्याबाजुला ४०-५० फुट अंतरावर एक रस्ता जात होता. हा तसा फार रहदारीचा रस्ता नव्हता. ह्या रस्त्याच्या एका हाताला उतार होता, जिथे घळीत शिकार होती आणि दुसर्या हाताला निबिड जंगल. बिबट्या जंगलातुन आला, रस्ता पार करुन खाली उतरला, जवळपासच्या गावातील हे वासरू मारुन त्या घळीत आणुन लपविले आणि परत रस्ता ओलांडून घरी! तो परत त्याच रस्त्यानं येणार हेही नक्की होतं. बिबट्या पहायला मिळणार ह्या आशेने दुपारी ४ च्या सुमारास प्रचंड रोमांचक अवस्थेत आम्ही शिकारीच्या जागी परतलो.
हळुहळू साडेचार झाले, एव्हाना एकूण सात जण शिकारीभोवती मोर्चेबांधाणी करु लागले होते. आम्ही तिघांनी एका बाजुला कार उभी केली होती, पुण्यातले दोन जिगरबाज मंडळी शिकारीला लागुन असलेल्या झाडावर चढुन बसले होते, तर नाईकसाहेब आणि एक जण आंब्याच्या झाडाच्या अलिकडे शिकारीपासुन १५-२० फुटांवर गवताचे कुंपण उभारुन लपले होते. अर्थात अश्या ठिकाणी कार जर बिबट्याच्या नजरेत खुपू द्यायची नसेल तर ती झाकून ठेवणे स्वाभाविक होते! आम्ही आजुबाजूचे गवत, काटक्या, पाने जे मिळेल त्याने गाडी झाकायला सुरवात केली. तेव्हढ्यात लक्षात आले की तंबूत एक मातकट रंगाची चादर आहे ती फार उपयोगी पडेल. मी पटकन म्हटलं की मी जाउन ती चादर घेउन येतो! निघालो! मी झरझर तो डोंगर चढुन रस्त्याला लागलो! आणि माझ्या आयुष्यातील प्रचंड थरारक क्षणांना सुरवात झाली!
त्या ठिकाणापासुन साधारण दोन किलोमिटर अंतरावर आमचा तंबु होता एव्हढे अंतर मला चालत जायचे होते. रस्त्यावर काळं कुत्रं नाही. आणि मला त्याच रस्त्यानं जायचं होते जिथुन बिबट्या येणार हे १००% नक्की होतं. गावकरी म्हणत होते ४च्या नंतर कधीही येईल. आत्ता ५ वाजत आलेले! आजुबाजूला किर्र झाडी आणि शंभर पावले चाललो नसेन आणि बाजुला बारीक खसखस ऐकु आली! मी स्तब्ध - घामेघुम! थरकाप उडणे म्हणजे काय असते ते पहायचे असेल तर अश्या प्रसंगात अडकावे! इथे आता एखाद्या फुलपाखराने जरी पंख फडफडवले असते तरी माझी टरकली असती. मी टक लावून झाडीकडे पहायला लागलो, कानात प्राण एकवटला, ह्रदयची धडधड मेंदुत पोचली होती ...... आणि एका चिमुकल्या माकडानं टुण्णकन् उडी मारली आणि दुर पळून गेले! मी सुटकेचा निश्वास टाकला. पण माझ्या आयुष्यातल्या सर्वात थरारक प्रसंगी माकडानं माझी फिरकी घेतली होती! माकड दिसणे हे माझ्या दृष्टीनं शुभ होतं, कारण एकतर ते माकड होतं, बिबट्या नव्हता आणि महत्वाचे म्हणजे जर बिबट्या आजुबाजुला असेल तर माकडं धोक्याचा इशारा देत ओरडत राहतात! म्हणजे इथे बिबट्याही नव्हता! मी खुष!
मी धावतपळत तंबु गाठला आणि परतायला लागलो. जसे जसे इप्सित स्थळी पोचु लागलो तसे तसे परत घाम, धडधड चालुच! कानात डोळ्यात तेल टाकुन चालत होतो. इतके "सजग" असल्याची आठवण मला तरी कधीही नाही! आता सोबतीला एक भलतेच टेन्शन! मला जाउन येईपर्यंत जवळजवळ अर्धा तास गेला होता, एव्हढ्यात जर तो बिबट्या शिकारीपाशी पोचला असेल तर? मी जिथुन खाली उतरत होतो, तिथे अशी गर्द झाडी होती की मी शिकारीच्या जवळ पोचेपर्यंत इतर कोणालाही दिसु शकत नव्हतो! म्हणजे कोणा माणसाला दिसायच्या आधी बिबट्याला! ह्रदयाची धडधड सांभाळत हळुहळु उतरु लागलो. झाडीतुन डोकावत डोकावत सावकाश ती शिकार पार करुन गाडीपाशी पोचलो. गाडीवर चादर अंथरुन त्यावर पालापाचोळा टाकुन गाडीत जाउन चुपचाप बसलो! गाडीत बसल्यावर मग कुठे जीवात जीव आला. साडेपाच झालेले, आजुबाजुच्या झाडीत काही हालचाल होतेय का ते आम्ही तिघे टक लाउन पहात होतो. प्रचंड शांतता, नजर, कान नजर झाडीकडे आणि हात कॅमेर्यावर!
सहा वाजत आले असतील आणि नाईकसाहेब त्यांचा आडोसा सोडुन बाहेर आले, झाडावरची पोरंही उतरली, काय झालं ते पहायला आम्हीही बाहेर पडून शिकारीजवळ गेलो. ते काय सांगतात ते ऐकून आम्ही आवाकच झालो! पाच मिनीटं आधी बिबट्या येउन गेला होता! आमच्यापासुन बाजुच्या गर्द झाडीमधुन तो अगदी २०-३० फुटांवरुन गेला, शिकारीच्या जवळ गेला, समोरच्या झाडांवरच्या पोरांशी नजरानजर झाली, त्याला कळलं आजुबाजुला माणसं आहेत, आल्या पावली निघुन गेला! आमच्या सगळ्यांपासुन हाकेच्या अंतरावरही नव्हता पण एव्हढं मोठ्ठं ते धुड फक्त दोघांना ओझरतं दर्शन देत निघुन गेलं. मला चादर आणुन पंधरा मिनिटेही झाली नसतील, तो तिथुन फार काही दूर नसणार तेव्हा! त्यानं मला रस्त्यावर पाहिलं असेल का? मला प्रत्यक्ष बिबट्या दिसला नाही पण त्याच्या नुसत्या उपस्थितीच्या शंकेने माझ्या आयुष्यातल्या थरारक क्षणांना जन्म दिला होता! अशा राजेशाही प्राण्याचा थरारही बाकी राजेशाहीच! गमतीचा भाग म्हणजे, ज्या प्राण्याला बघायचं म्हणुन इतकी तगतग चाललेली तो दिसेल म्हणुनच माझी भंबेरी उडाली होती!
तुमच्या आयुष्यातला थरारक क्षण कोणता?

Tuesday, July 13, 2010
अँड्रीय आणि भारत!
"तुझे भारतात अजुनही काही काँटॅक्ट्स आहेत का?"
"हो अर्थातच! मला इथे येउन पंधरा दिवस तर झालेत, त्याआधी भारतात तर होतो!"
जेवण गरम करता करता, अँड्रीयचा आणि माझा हा "हाय-हॅल्लो" च्या व्यतरिक्त झालेला पहिला संवाद. अँड्रीयकडे बघुन जर त्याचे एका शब्दात वर्णन करा असे कोणी सांगितले असते तर मी म्हणालो असतो - मंद! काही माणसे असतात की ज्यांच्याकडे पाहुन तुम्हालाही एकदम उत्साही वाटायला लागते आणि काही माणसे अशी असतात की, ब्रह्मदेवाने 'जरा बाहेर जाउन येतो, तो पर्यंत जरा ह्या विश्वाच्या पसा-याकडे बघ' असे सांगुन समस्त विश्वाची आर्तता ह्यांच्या खांदी दिल्यासारखे दिसते. अँड्रीय दुस-या श्रेणीतला! नुकतेच e=mc squre चा शोध लावुन आलेल्या आईनस्टाइन सारखी केशभुषा, सदैव अर्धोन्मिलीत नेत्र, 'विश्वाची आर्तता'वाला चेहरा, अत्यंत (म्हणजे अगदीच अत्यंंत) संथगामी बोलणं अश्या ह्या अँड्रीयची समोरच्या व्यक्तीवर छाप पाडायची शक्यता शून्य! अँड्रिय मुळचा रशियाचा पण गेले अनेक वर्षंं कॅनडात आहे. (रशियाचा आहे त्यामुळे तो हुशार असावा असे मी मानुन चाललोय!) तो माझ्याच लॅब मध्ये काम करतो पण आमचे कधीच बोलणे झाले नव्हते. इन फॅक्ट आमच्या लॅब मध्ये कोणिच कोणाशी काहिही बोलत नाही, चुकुन बोललेच तरी अत्यंत बारिक आवाजात! (आणि ह्याउलट आमची पुण्याची लॅब! वैभव आणि मी लॅबच्या एका टोकाहुन दुस-या टोकाला एकमेकांना खड्या आवाजात हाक टाकायचो! बाकीच्यांना डिस्टर्ब वगैरे होते हे आमच्या ध्यानीमनीही नसायचे! आणि तसेही लॅबमध्ये हळू बोलण्याचा कायदा आमच्या मास्तरांच्या अखत्यारीत अस्तित्वात यायची शक्यताच नव्हती!) बाकी काही असो पण त्या दिवसापर्यंत मी अँड्रियला हसताना कधीच पाहिले नव्हते. आणि आत्ता तो हसला!
अँड्रीय : "[हसत] तु कोणत्या शहरातुन आहेस?"
मी : "पुणे .. बॉम्बे माहितीय? तिथुन जवळच आहे!" (पुणे-मुंबई अंतर हे कॅनडाच्या कोणत्याही स्केलवर "जवळ" ह्या प्रकारातच मोडते.)
अँड्रीय :"ओह्ह पुणे?? म्हणजे तो आश्रम आहे तिथेच ना?"
मी : "ओशो आश्रम?"
अँड्रीय :"हां हां! तोच!"
पुण्याचा शनिवारवाडा, गणेशोत्सव, फेस्टिवल, संस्कृती, (आगाऊ) पुणेकर, पर्वती,विद्यापीठ, आगाखान पॅलेस, केळकर संग्रहालय इ. इ. सगळे सोडून नेमके आश्रमच बरे सगळ्यांना माहित असतो! (प्रश्न : वरिल वाक्यातुन लेखकाचा पुणेरी आगाऊपणा कसा दिसतो ते थोडक्यात लिहा! (अजुन एक प्रश्न : लेखक कंस वापरणे कधी सोडणार आहे?))
मी : "तु ओशो-भक्त आहेस का?"
तो : "छे छे! असेच ऐकुन आहे .. खरेतर मला भारताविषयी बरेच काय काय माहितीय"
खरेच! त्याला भारताबद्दल काय काय माहीत होतं. ताजमहाल पासुन जर्मन बेकरी पर्यंत! त्या दिवसा नंतर जवळजवळ रोज आम्ही जेवताना भारत, रशिया आणि कॅनडा ह्यांच्यातील राजकीय संबध, लोकसंखेचे बलाबल, विद्वत्ता, संस्कृती आणि जे काही सापडेल त्या सर्व विषयांवर चर्चा करु लागलो! हळुहळू त्याच्या काही इंटरेस्टींग बाजु मला लक्षात येउ लागल्या! अँड्रीय खाली मान घालुन बोलतो, नजरेस नजर भिडवून बोलणे त्याला काही जमत नाही! तसे अँड्रीयला जोक करायला आवडतात, पण त्याची समस्या अशी आहे की तो इतका संथपणे बोलतो की त्याचा जोक संपायच्या आतच एकतर तो जोक समोरच्याला आधीच कळलेला असतो किंवा समोरच्याला "बोर झालेले" असते! अँड्रीयला एकुणच भारताबद्दल कमालीचं कुतुहल. "तुमच्याकडे म्हणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भाषा बोलली जाते?" "तुमच्यातले काही लोकं खुप जास्त श्रीमंत आहेत म्हणे?" "भारतात किती धर्माचे लोक राहतात?" "सध्या बॉलीवूडला कुठली हिट मुव्ही आहे?" एक ना दोन अनेक प्रश्न तो सदैव विचारु लागला! आयुष्यात एकदातरी भारतात यायचे असा त्याचा निर्धार आहे, पण सध्यातरी पोस्ट-डॉकचा तुटपुंजा पगार हा प्रमुख अडथळा आहे. (पोस्टडॉक, त्यांचा पगार आणि त्यांचे (नसलेले) सामाजिक स्थान हा आमच्याकडच्या सर्वात आवडीच्या आणि ज्वलंत विषयांपैकी एक!) मला बाकी कुतुहल की ह्याला इतकी का भारताबद्दल आस्था?
उत्तर सोपे होते - अँड्रीय "योगा" करतो आणि सोबत तो शाकाहारी आहे. ज्या दिवशी त्याला कळलं की मी पण शाकाहारी आहे त्यादिवसापासुन तो माझ्याशी अधिकच खुलून बोलायला लागला. प्राण्यांना मारणे कसे वाईट आणि शाकाहार कसा चांगला ह्याबद्दल त्याने मला एक पंधरा मिनिटांचे लेक्चरपण दिले! आयुष्यात ज्याने कधीच मांसाहार केला नाही, अश्या मला अजुन एक शाकाहारी घास भरवून तो मोकळा झाला! पण त्याला खुलून बोलताना बघायचे असेल तर "योगा" ह्या विषयावर बोलावे!
अँड्रीय : योगा प्रकृतीला चांगला असतो! तू कधी केलायंस का?
मी : हो! लहानपणी करायचो पण आता सोडलं (खोटे खोटे साफ खोटे! शाळेत अर्धा तास, "काय कटकट आहे" असे म्हणून मारलेल्या हातापायांच्या गाठी योगा प्रकारात मोडत नाहीत!)
तो : तुझे आवडते "आसना" कोणते?
मी : [हसत हसत] शवासन! (त्याला विनोद कळला नाही; माझा पोपट!)
तो : ह्म्म्म
मी : आणि तुझे?
तो : मला नीट नावे लक्षात राहत नाहीत, कोणते बरे ते आसन? त्यात पाय वर करतात आणि डोके ... (त्याला मध्येच तोडून)
मी : शिर्षासन?
तो : नाही नाही.. [खांद्यावर हात लावत] डोक्याचा खालचा भाग जमिनीला लावायचा आणि उलटे उभे राहायचे ..
मी : सर्वांगासन??
तो : हां ऽऽऽ! सर्वांगासना!
मी : तु कुठे शिकलास योगा?
तो : मॉस्कोमध्ये. अय्यंगार योगा! आमच्याकडे योगा शिकवायला एक भारतीय गुरु यायचे. त्यांचे शिक्षण प्रत्यक्ष अय्यंगारांच्याकडे झालेले आहे! तुला "पातांजाली योगासूत्रा" माहितीय का?
मी : पातंजली योगसूत्र? हो हो, माहितीय ना
तो : आमचे गुरू त्याच्या रेफरन्सने शिकवायचे! (मी डोळ्यासमोर चित्र उभं करायचा दुबळा प्रयत्न केला आणि सोडुन दिला!)
पुढिल अर्धा तास मला तो योगाच्या वेगवेगळ्या लेव्हल्स, मॉस्कोतले गुरूवर्य अश्या विषयावर सविस्तर माहिती सांगायचा प्रयत्न करत होता! तो इतका तन्मयतेने बोलतो तेव्हा लक्षात येते की ह्याला भारतात यायची इतकी ओढ का आहे!
गेल्या काही दिवसांपासुन एकदमच तो लॅब मधुन गायब झालाय. आता चौकशी केल्यावर ध्यानात आलयं की गेल्या परवा त्याला मुलगा झालाय! आता मला वेगळीच चिंता आहे, पुत्ररत्नाच्या आगमनानंतर ह्याच्या चेह-यावरची आठी वाढणार की कमी होणार?! :)
"हो अर्थातच! मला इथे येउन पंधरा दिवस तर झालेत, त्याआधी भारतात तर होतो!"
जेवण गरम करता करता, अँड्रीयचा आणि माझा हा "हाय-हॅल्लो" च्या व्यतरिक्त झालेला पहिला संवाद. अँड्रीयकडे बघुन जर त्याचे एका शब्दात वर्णन करा असे कोणी सांगितले असते तर मी म्हणालो असतो - मंद! काही माणसे असतात की ज्यांच्याकडे पाहुन तुम्हालाही एकदम उत्साही वाटायला लागते आणि काही माणसे अशी असतात की, ब्रह्मदेवाने 'जरा बाहेर जाउन येतो, तो पर्यंत जरा ह्या विश्वाच्या पसा-याकडे बघ' असे सांगुन समस्त विश्वाची आर्तता ह्यांच्या खांदी दिल्यासारखे दिसते. अँड्रीय दुस-या श्रेणीतला! नुकतेच e=mc squre चा शोध लावुन आलेल्या आईनस्टाइन सारखी केशभुषा, सदैव अर्धोन्मिलीत नेत्र, 'विश्वाची आर्तता'वाला चेहरा, अत्यंत (म्हणजे अगदीच अत्यंंत) संथगामी बोलणं अश्या ह्या अँड्रीयची समोरच्या व्यक्तीवर छाप पाडायची शक्यता शून्य! अँड्रिय मुळचा रशियाचा पण गेले अनेक वर्षंं कॅनडात आहे. (रशियाचा आहे त्यामुळे तो हुशार असावा असे मी मानुन चाललोय!) तो माझ्याच लॅब मध्ये काम करतो पण आमचे कधीच बोलणे झाले नव्हते. इन फॅक्ट आमच्या लॅब मध्ये कोणिच कोणाशी काहिही बोलत नाही, चुकुन बोललेच तरी अत्यंत बारिक आवाजात! (आणि ह्याउलट आमची पुण्याची लॅब! वैभव आणि मी लॅबच्या एका टोकाहुन दुस-या टोकाला एकमेकांना खड्या आवाजात हाक टाकायचो! बाकीच्यांना डिस्टर्ब वगैरे होते हे आमच्या ध्यानीमनीही नसायचे! आणि तसेही लॅबमध्ये हळू बोलण्याचा कायदा आमच्या मास्तरांच्या अखत्यारीत अस्तित्वात यायची शक्यताच नव्हती!) बाकी काही असो पण त्या दिवसापर्यंत मी अँड्रियला हसताना कधीच पाहिले नव्हते. आणि आत्ता तो हसला!
अँड्रीय : "[हसत] तु कोणत्या शहरातुन आहेस?"
मी : "पुणे .. बॉम्बे माहितीय? तिथुन जवळच आहे!" (पुणे-मुंबई अंतर हे कॅनडाच्या कोणत्याही स्केलवर "जवळ" ह्या प्रकारातच मोडते.)
अँड्रीय :"ओह्ह पुणे?? म्हणजे तो आश्रम आहे तिथेच ना?"
मी : "ओशो आश्रम?"
अँड्रीय :"हां हां! तोच!"
पुण्याचा शनिवारवाडा, गणेशोत्सव, फेस्टिवल, संस्कृती, (आगाऊ) पुणेकर, पर्वती,
मी : "तु ओशो-भक्त आहेस का?"
तो : "छे छे! असेच ऐकुन आहे .. खरेतर मला भारताविषयी बरेच काय काय माहितीय"
खरेच! त्याला भारताबद्दल काय काय माहीत होतं. ताजमहाल पासुन जर्मन बेकरी पर्यंत! त्या दिवसा नंतर जवळजवळ रोज आम्ही जेवताना भारत, रशिया आणि कॅनडा ह्यांच्यातील राजकीय संबध, लोकसंखेचे बलाबल, विद्वत्ता, संस्कृती आणि जे काही सापडेल त्या सर्व विषयांवर चर्चा करु लागलो! हळुहळू त्याच्या काही इंटरेस्टींग बाजु मला लक्षात येउ लागल्या! अँड्रीय खाली मान घालुन बोलतो, नजरेस नजर भिडवून बोलणे त्याला काही जमत नाही! तसे अँड्रीयला जोक करायला आवडतात, पण त्याची समस्या अशी आहे की तो इतका संथपणे बोलतो की त्याचा जोक संपायच्या आतच एकतर तो जोक समोरच्याला आधीच कळलेला असतो किंवा समोरच्याला "बोर झालेले" असते! अँड्रीयला एकुणच भारताबद्दल कमालीचं कुतुहल. "तुमच्याकडे म्हणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भाषा बोलली जाते?" "तुमच्यातले काही लोकं खुप जास्त श्रीमंत आहेत म्हणे?" "भारतात किती धर्माचे लोक राहतात?" "सध्या बॉलीवूडला कुठली हिट मुव्ही आहे?" एक ना दोन अनेक प्रश्न तो सदैव विचारु लागला! आयुष्यात एकदातरी भारतात यायचे असा त्याचा निर्धार आहे, पण सध्यातरी पोस्ट-डॉकचा तुटपुंजा पगार हा प्रमुख अडथळा आहे. (पोस्टडॉक, त्यांचा पगार आणि त्यांचे (नसलेले) सामाजिक स्थान हा आमच्याकडच्या सर्वात आवडीच्या आणि ज्वलंत विषयांपैकी एक!) मला बाकी कुतुहल की ह्याला इतकी का भारताबद्दल आस्था?
उत्तर सोपे होते - अँड्रीय "योगा" करतो आणि सोबत तो शाकाहारी आहे. ज्या दिवशी त्याला कळलं की मी पण शाकाहारी आहे त्यादिवसापासुन तो माझ्याशी अधिकच खुलून बोलायला लागला. प्राण्यांना मारणे कसे वाईट आणि शाकाहार कसा चांगला ह्याबद्दल त्याने मला एक पंधरा मिनिटांचे लेक्चरपण दिले! आयुष्यात ज्याने कधीच मांसाहार केला नाही, अश्या मला अजुन एक शाकाहारी घास भरवून तो मोकळा झाला! पण त्याला खुलून बोलताना बघायचे असेल तर "योगा" ह्या विषयावर बोलावे!
अँड्रीय : योगा प्रकृतीला चांगला असतो! तू कधी केलायंस का?
मी : हो! लहानपणी करायचो पण आता सोडलं (खोटे खोटे साफ खोटे! शाळेत अर्धा तास, "काय कटकट आहे" असे म्हणून मारलेल्या हातापायांच्या गाठी योगा प्रकारात मोडत नाहीत!)
तो : तुझे आवडते "आसना" कोणते?
मी : [हसत हसत] शवासन! (त्याला विनोद कळला नाही; माझा पोपट!)
तो : ह्म्म्म
मी : आणि तुझे?
तो : मला नीट नावे लक्षात राहत नाहीत, कोणते बरे ते आसन? त्यात पाय वर करतात आणि डोके ... (त्याला मध्येच तोडून)
मी : शिर्षासन?
तो : नाही नाही.. [खांद्यावर हात लावत] डोक्याचा खालचा भाग जमिनीला लावायचा आणि उलटे उभे राहायचे ..
मी : सर्वांगासन??
तो : हां ऽऽऽ! सर्वांगासना!
मी : तु कुठे शिकलास योगा?
तो : मॉस्कोमध्ये. अय्यंगार योगा! आमच्याकडे योगा शिकवायला एक भारतीय गुरु यायचे. त्यांचे शिक्षण प्रत्यक्ष अय्यंगारांच्याकडे झालेले आहे! तुला "पातांजाली योगासूत्रा" माहितीय का?
मी : पातंजली योगसूत्र? हो हो, माहितीय ना
तो : आमचे गुरू त्याच्या रेफरन्सने शिकवायचे! (मी डोळ्यासमोर चित्र उभं करायचा दुबळा प्रयत्न केला आणि सोडुन दिला!)
पुढिल अर्धा तास मला तो योगाच्या वेगवेगळ्या लेव्हल्स, मॉस्कोतले गुरूवर्य अश्या विषयावर सविस्तर माहिती सांगायचा प्रयत्न करत होता! तो इतका तन्मयतेने बोलतो तेव्हा लक्षात येते की ह्याला भारतात यायची इतकी ओढ का आहे!
गेल्या काही दिवसांपासुन एकदमच तो लॅब मधुन गायब झालाय. आता चौकशी केल्यावर ध्यानात आलयं की गेल्या परवा त्याला मुलगा झालाय! आता मला वेगळीच चिंता आहे, पुत्ररत्नाच्या आगमनानंतर ह्याच्या चेह-यावरची आठी वाढणार की कमी होणार?! :)
Saturday, July 3, 2010
ब्लू-बर्ड बँडींग!
ब्लूबर्डची पिसं |
आणखी एक गमतीचा भाग म्हणजे ह्याच्या पिसांचा रंग ह्या त्या पिसांमधिल कोणत्याही रासायनिक घटकद्रव्यांमुळे (जसे की pigments) आलेला नसुन, पिसांच्या विशिष्ट प्रकारच्या रचनेमुळे आला आहे. पिसांच्या सुक्ष्म रचनेमुळे फक्त निळा प्रकाश बाहेर परावर्तित केला जातो आणि त्यामुळे पिसांना तो रंग प्राप्त होतो. जर एखादे पिस प्रकाशाच्या स्त्रोताच्या पुढे धरुन पाहिले (backlit) तर तिच पिसे राखाडी रंगाची दिसतात!!
नेस्टबॉक्स |
ब्लू-बर्ड स्वतः घरटे बांधत नाहीत. झाडांमधिल एखादे नैसर्गिक छिद्र किंवा एखाद्या सुतार पक्ष्याने वापरुन सोडलेले छिद्र हे ह्यांचे आवडते आश्रयस्थान! पण सर्वात जास्त ब्लूबर्ड कुठे निवारा करत असतील तर ते मनुष्यनिर्मित नेस्टबॉक्स मध्ये!! भारताच्या तुलनेत कॅनडामधे (विशेषतः शहराबाहेर) फिरताना एक फरक प्रकर्षाने जाणवतो तो म्हणजे इथे लोकं नेस्टबॉक्सेस खुप बांधतात! शेताच्या कुंपणावर जवळजवळ प्रत्येक खांबावर एक नेस्टबॉक्स उभा असतो. हे नेस्टबॉक्स स्वाभाविकपणे अनेक पक्ष्यांचे आश्रयस्थान होतात. भारतात असे फारच कमी आढळते! :(
ह्या नेस्टबॉक्सेसचा फायदा पक्षी-निरिक्षक न उठवतील तर नवलच. "जॅक पार्क" हे असेच एक निरिक्षक. जॅक ७२ वर्षांचे आहेत आणि गेले तब्बल ४५ वर्ष ते पक्षी-निरिक्षक आहेत! अर्थातच ह्या क्षेत्रातील त्यांची हातोटी आणि अनुभव वादातीत आहे! जॅक अजुनही काम करतात. आमच्या गावातील वाईल्डबर्ड जनरल स्टोअर्स मध्ये ते कामाला असतात! (अवांतरः भारतात किती लोक रिटायर झाल्यावर काम करतात?). गेले काही वर्षे जॅक एका भन्नाट कामात मग्न आहेत - ब्लू-बर्ड बँडींग!
"बँडींग" किंवा "रिंगिंग" हा पक्ष्यांचा अभ्यासातला महत्वाचा घटक. पक्षी कुठुन कसे स्थलांतर करतात, किती वर्षं जगतात, कसे जगतात ह्याचा अभ्यास करण्यासाठी पक्ष्यांच्या पायात (किंवा मानेवर किंवा पंखावर) एक बिल्ला/पट्टी जाते. ह्या पट्टीवर एक सांकेतिक क्रमांक असतो. एकदा का हा क्रमांक पक्ष्याच्या अंगावर चढवला की त्याची नोंद एका डाटाबेस मधे केली जाते. त्यामुळे जेव्हा तो पक्षी स्थानांतर करतो त्यावेळी त्याच्या अंगावरच्या पट्टीवरिल क्रमांकावरुन तो कुठुन आला, कसा आला ह्याची माहीती मिळवता येते!
तर ब्लू-बर्ड पक्ष्याची माहिती जमवण्यासाठी जॅक ह्यांनी त्यांचे बँडींग १९७४ साली सुरु केले, (स्वयंप्रेरणा आणि स्वयंखर्च) आणि ते अजुनही अव्याहत पणे चालु आहे. दर उन्हाळ्यात ब्लू-बर्डस् स्थलांतर करुन गावाबाहेरच्या शेतांवरच्या बॉक्सेसमध्ये घरटी करतात आणि जॅक त्यांच्या पायात रिंग चढवतात अन्यथा असलेल्या रिंगचा अभ्यास करतात. आणि ज्या कोणाला हे सर्व कसे चालते ते पाहयचे आहे त्यांना आनंदाने स्वतःच्या गाडीतुन घेउन जातात. अर्थातच अशी संधी सोडुन कसे चालेल? त्यामुळे अशाच एका अभियानात मी त्यांना सामिल झालो.
अंडे |
पिल्लं |
तो बॉक्स सोडुन आम्ही किलोमीटरभर पुढच्या बॉक्सपाशी सरकलो. इथे बाकी आमचे नशीब फळफळले! बॉक्स मध्ये पिल्लं होती - एकुण पाच! जॅकने काही दिवसांपुर्वी ह्या घरट्यात अंडी पाहिली होती त्यामुळे ते बँडींगच्या तयारीतच आले होते. बँडींग करताना एकेका पक्षाला घरट्याबाहेर काढाचचे, पायात काळजीपुर्वक रिंग चढवायची आणि त्याची वहीत नोंद करुन ठेवायची असा क्रम ठरलेला असतो.
पिल्लाला बँडींग करताना |
ह्या सगळ्या अभ्यासातुन अनेक गोष्टी जॅकना सापडल्या. एकदा त्यांनी रींग चढवलेला पक्षी तब्बल सात वर्षांनी त्यांना परत सापडला! त्यांच्या हेही लक्षात आले की, नर-मादी आयुष्यभर एकत्र राहतात आणि जर संधी मिळाली तर तोच तोच बॉक्स दरवर्षी वापरतात. म्हणजे दर उन्हाळ्यात ते जेव्हा अमेरिकेतुन हजारो किलोमिटरचा प्रवास करुन कॅनडात येतात तेव्हा ते विशिष्ट गावातील विशिष्ट शेताच्या कुंपणावरिल विशिष्ट बॉक्स शोधुन तिथेच नव्याने घर बसवतात! पण समस्या अशी असते की हे बॉक्स वापरुन झाल्यावर घाण झालेले असतात, मग जॅकसारखी माणसे ब्लू-बर्ड येण्याच्या अगदी आधी सगळे बॉक्सेस साफ करुन ठेवतात!!
पिल्लांशी चाललेले "खेळ" बघुन वैतागलेले आई-बाबा! |
भारतातही बँडींग केले जाते पण फारच कमी प्रमाणात! जे होते ते कोणत्या तरी संस्थेतर्फे असते. जॅक सारखे एकलकोंडे बँड बांधणारे मी कोणीच पाहिले नाहित. मला इथे येउन काही महिने झाले नाहित आणि मी अनेक बॅंडींगच्या कार्यक्रमाविषयी ऐकले आणि दोन कार्यक्रमात सहभागी पण झालो. भारतात अशी संधी कधीच मिळाली नव्हती :(. असे का?!
Sunday, June 27, 2010
अथ श्री
तीन महिने होत आले, कॅनडामध्ये येउन. बरेच दिवस मनात होते की एक अनुदिनी सुरु करुन काहीतरी लिहित जावे! आज शेवटी मुहुर्त लागला! आता बघु कसे सुरु ठेवता येते ते! :)
मी इथे काय लिहिणार? खरेतरं हा प्रश्न मलाही पडलाय, तरिही उत्तर द्यायचेच झाले तर ते असेल - काहिही! प्रमुख्याने इथले जीवन, इथली माणसे, इथली संस्कृती, आजुबाजुचे वातावरण, इथली हवा आणि हवामान, इथला निसर्ग आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इथले पक्षी!! कॅनडात आल्यापासुन मी बरेच जास्त प्रमाणात पक्षीनिरिक्षण सुरु केलं आणि त्यायोगे इथल्या निसर्गाशी आणि त्याच्यासी जोडलेल्या माणसांशी ओळख झाली. ह्या अनुदिनीद्वारे ही माणसे, निसर्ग आणि पक्षी (आणि जमल्यास थोडेसे फिजिक्स) डोकावत राहतील हे नक्की!

Subscribe to:
Posts (Atom)